निवडक वेचक – जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन येणार
टेक्नो मोबाईल जगातील सर्वात स्लिमेस्ट म्हणजेच पातळ स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पोवा स्लीम 5 जी सीरीजमधील हा स्मार्टफोन 4 सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. 3 डी कर्व्ड डिस्प्ले असणारा हा जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.
प्रसाद दिला नाही; सेवेकऱ्याला मारहाण
नवी दिल्ली : कालकाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक आणि सेवेकऱ्यांमध्ये वस्त्र आणि प्रसादावरून वाद झाला. यावेळी संतापलेल्या भाविकांनी सेवेकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतुल पांडे नावाच्या भाविकाला अटक केली.
आरसीबी पीडितांना देणार प्रत्येकी 25 लाख भरपाई
चेन्नई : आयपीएल टीम आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आरसीबीने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
युक्रेनियन संसदेच्या माजी सभापतींची हत्या
किव्ह : युक्रेनियन संसदेचे माजी सभापती अँड्री पारुबी यांची ल्विव्ह शहरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पारुबी हे एका खासगी कार्यक्रमातून परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
अमेरिकेत शीख व्यक्तीला गोळ्या घातल्या
लॉस एंजेलिस : येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका 35 वर्षीय शीख व्यक्तीचा मृत्यू झाला. गुरप्रीत सिंग असे या व्यक्तीचे नाव असून तो हातात तलवार घेऊन उभा होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो शीख धर्मियांचा पारंपरिक युद्धकला प्रकार सादर करताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List