आली गवर सोनपावली…
गणपतीपाठोपाठ घरोघरी आज गौराई विराजमान झाली. राज्यभरात गौरी आगमनाचा उत्साह दिसून आला. ‘गवर आली सोन्याच्या पावलांनी… गवर आली माणिक मोतीच्या पावलांनी’ असे म्हणत पारंपरिक पद्धतीने लाडक्या गौरींची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागांत गौरींचे वाजतगाजत आगमन झाले. कुठे खडय़ाच्या गौरी, तर कुठे धान्याच्या राशीवर गौरींचे मुखवटे, तर कुठे तेरडय़ाची रोपे आणून गौरी बसवण्यात आल्या. उद्या सोमवारी ज्येष्ठ गौरींचे पूजन होईल. यानिमित्त गौराईला पंचपक्वान्नांचा नैवैद्य दाखवण्यात येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List