कश्मीरच्या रियासी, रामबनमध्ये ढगफुटीने हाहाकार 24 तासांत 17 जणांचा मृत्यू; 32 भाविक बेपत्ता

कश्मीरच्या रियासी, रामबनमध्ये ढगफुटीने हाहाकार 24 तासांत 17 जणांचा मृत्यू; 32 भाविक बेपत्ता

जम्मू-कश्मीरच्या रियासी आणि रामबन येथे ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आहे. दगड, माती आणि चिखलाच्या लोंढय़ाखाली अनेकजण दबले असण्याची शक्यता असून अनेक घरे, दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 32 जण बेपत्ता झाले आहेत.

14 ऑगस्टपासून या भागात सातत्याने ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यात रियासीमध्ये 12 जणांचा तर रामबन येथे 5 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वैष्णोदेवी यात्रा मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आज पाचव्या दिवशीही स्थगित करण्यात आली. आतापर्यंत 34 भाविकांचा मृत्यू झाला असून कटरा ते वैष्णोदेवीपर्यंतच्या 12 किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे उखडला गेला आहे.

हिमाचलमध्ये 557 रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. परिणामी तब्बल 557 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात तीन राष्ट्रीय महामार्ग आणि मंडीतील सर्वाधिक 213 रस्त्यांचा समावेश आहे, तर उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;