आरव, प्रेक्षा, वेदांत, ध्रुव, प्रसादचे विजय

आरव, प्रेक्षा, वेदांत, ध्रुव, प्रसादचे विजय

श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे आयोजित श्रीकांत चषक शालेय कॅरम स्पर्धेत आरव सावंत, प्रेक्षा जैन, वेदांत राणे, ध्रुव शहा, प्रसाद माने यांनी विजय मिळवले. चॅम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने सुरू झालेल्या स्पर्धेत आरव सावंतने खेळामध्ये कमालीचे सातत्य राखताना स्वरूप बेलणकरचा 16-4 असा पराभव केला. प्रेक्षा जैनने धृती रायला 6-2 असे हरवले. वेदांत राणेने एकतर्फी लढतीत निधी सावंत हिच्यावर 15-2 अशी मात केली. ध्रुव शहाने रुद्र चव्हाणला 11-7 असे चकवले तर प्रसादने ग्रीष्मा धामणस्करला अशा एकतर्फी सामन्यात 19-0 अशा फरकाने पराभूत केले. प्रसादने अप्रतिम खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण मिळविण्याची संधी दिली नाही. आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत मुंबई शहर व उपनगरसह ठाणे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील खेळाडू सहभागी झाले. श्रीकांत स्पोर्टस् क्लबच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिवर्षी युवा खेळाडू व कलाकारांना प्रोत्साहन देताना विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी मोफत शालेय कॅरम स्पर्धा गतवर्षापासून अधिक लोकप्रिय ठरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;