पर्याकरणपूरक विसर्जनासाठी सोलापुरात 11 कुंड, 69 मूर्ती संकलन केंद्रे
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यालेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसेच सर्व मध्यकर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली. याशिवाय विष्णू घाट, गणपती घाट, छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील कृत्रिम विसर्जन कुंडांचीही पाहणी करण्यात आली.
यंदा शहरात 11 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसेच 69 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात येणार असून, नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागांना आकश्यक त्या सूचना दिल्या. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाशयोजना करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, मिरवणूक मार्गावरील अडथळा आणणाऱया केबल वायरींचे नियोजन करणे, विसर्जन कुंडांवर अधिक प्रकाशयोजना करणे, अधिक अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करणे, मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर जनावरे येणार नाहीत, याची काळजी घेणे तसेच मिरवणूक मार्गावर ड्रेनेजचे पाणी लाहणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अक्कलकार, अतिक्रमण व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. ओंबासे यांनी गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तयारी पूर्ण करावी, अशी सूचना संबंधित अधिकाऱयांना दिली. यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List