एकाच व्यक्तीकडे सापडले 8 आधार, 8 लायसन्स अन् 16 मतदार कार्ड…

एकाच व्यक्तीकडे सापडले 8 आधार, 8 लायसन्स अन् 16 मतदार कार्ड…

बिहारमधील हिंदुस्थान नेपाळ सीमेजवळ राहत असलेल्या एका व्यक्तीकडे बनावट कागदपत्रांचा अक्षरशः खजिनाच सापडला. येथील घोडासन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही व्यक्ती सायबर कॅफे चालवते. भूषण चौधरी असे त्याचे नाव असून पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून धक्कादायक माहिती हाती लागली.

पोलिसांनी घटनास्थळावरून विविध देशांचे चलन, पासबूक, परदेशी घडयाळ, 8 आधारकार्ड, 8 ड्रायव्हिंग लायसन्स आणि 16 मतदार ओळखपत्रे ताब्यात घेतली. याशिवाय सहा श्रम कार्ड आणि 4 बँक पासबुक तसेच एक चेकबूक आणि 9 स्कॅनरही पोलिसांनी जप्त केली. याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले असून या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. भूषण चौधरी याचा मुलगा गोली चौधरी याला उत्तर प्रदेश पोलिसांनी याआधीच अटक केली. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;