1 कोटी जिंकणाऱ्या जवानाची बदली
मागील आठवडय़ात अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात भाग घेऊन 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मधील डेप्युटी कमांडेंट आदित्य कुमारची सीआयएसएफने बदली केली आहे. गुजरातच्या उकई येथे कार्यरत असलेल्या आदित्य कुमारची बदली आता जम्मू कश्मीरच्या बांदीपोरामध्ये करण्यात आली आहे. आदित्य कुमार यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे सीआयएसएफसह अन्य केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य कुमार यांच्या नियमित बदलीची वेळ अजून आली नव्हती, असे काहींचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते जवानाने ‘कौन बनेगा करोडपती’ यासारख्या कार्यक्रमात भाग घेतल्याचे सीआयएसएफमधील वरिष्ठ अधिकाऱयांना आवडलेले दिसत नाही, त्यामुळे आदित्य कुमारची बदली करण्यात आली आहे. बदली झाल्यानंतर बोलताना आदित्य कुमार म्हणाले की, हे विभागातील प्रकरण आहे. या ठिकाणी सर्व काही नियमानुसार होत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List