Maratha Reservation Protest : मुंबईतून एकतर विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा – मनोज जरांगे पाटील
मुंबईतून एकतर विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा जाणार. मी हटणार नाही. मी एकदा जे बोललो, ते करतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण बसले आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना सरकारला इशारा देत ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “मी आयुष्याला महत्त्व देत नाही, मी समाजाच्या आयुष्याला महत्त्व देतो.”
‘सरकारकडून वेळकाढूपणा सुरु आहे’
पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारकडून वेळकाढूपणा सुरु आहे. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही.” सरकारला इशारा देत ते म्हणाले आहेत की, आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारंचं फिरणं मुश्किल होईल.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा तोडगा सोपा आहे. सरसकट शब्द तुम्ही लावू नका. तुमचं म्हणणे आहे की, उपसमितीची दोनवेळा बैठक झाली. मला माहीत नाही. पण सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे.” ते म्हणाले, “तुमच्याकडे ५८ लाखाचा नोंदीचा आधार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचे सापडले नाही, त्यांची पोटजात उपजात वापरून आरक्षण द्या ना, सरसकट म्हणू नका.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List