लडाखजवळ अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोघांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसयुव्ही कार नदीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लडाखजवळ घडली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. लडाखजवळील द्रास परिसरात गुमरीजवळ ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, एसयूव्ही चालक रस्त्याने वळण घेत असताना अचानक कार नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत पडली. त्यानंतर कार घसरून नदीत पडली. स्थानिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. यानंतर लष्कर आणि पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत तातडीने बचाव कार्य सुरू केले. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. अपघात नेमक्या कोणत्या कारणातून झाला? वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List