पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप, २७५ सार्वजनिक तर १६८१६ घरगुती गणपतींचे विसर्जन

पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप, २७५ सार्वजनिक तर १६८१६ घरगुती गणपतींचे विसर्जन

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर थिरकणारी तरुणाई अशा मोठ्या जल्लोषात रविवारी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहर आणि उपनगरात रात्री ९ वाजेपर्यंत २७५ सार्वजनिक तर १६८१६ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर रविवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या बाप्पाचे समुद्र, कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. विसर्जनसाठी पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारनंतर चौपाट्या, कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनसाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूका सुरू होत्या. गर्दी टाळण्यासाठी काही सोसायट्यांनी सोसायटीच्या आवारातच बाप्पाचे विसर्जन केले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बच्चेकंपनी भावूक झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस...
बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?