अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाने निधन झाले आहे. ती 38 वर्षांची होती. आजारपणामुळेच प्रियाने तुझेच मी गीत गात आहे ही मालिका सोडली होती. आज पहाटे चारच्या सुमारास प्रियाची प्राणज्योत मालवली
2006 साली आलेल्या झी मराठीवरील ‘या सुखांनो या’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर चार दिवस सासूचे, तु तिथे मी या मराठी मालिकेतही तिने काम केलं होतं. त्यानंतर पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है या हिंदी मालिकांध्येही प्रियाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
प्रियाला कर्करोग झाला होता. त्यावर ती उपचारही घेत होती. पण उपचार घेताना तिची तब्येत खालावली होती. त्यामुळे आपण तुझेच मी गीत गात आहे ही सोडत असल्याचे जाहीर केले होते. आज पहाटे चार वाजता प्रियाचे निधन झाले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच शोककळा पसरली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List