आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पाणी आणि शौचालयाची सोय, मुंबई पालिकेची माहिती; 800 सफाई कर्मचारी तैनात
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांसाठी जवळपास 800 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले असून, 300 हून अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांना, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची अद्ययावत माहिती – (दिनांक ३१ ऑगस्ट २०२५)
पाणी टँकर्स –
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण २५ टँकर उपलब्ध करून दिले… pic.twitter.com/NNOpMm0jQC— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 31, 2025
बृहन्मुंबई महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची तसेच कचरा संकलनाचीही व्यवस्था केली आहे. रविवारी आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू आहे. राज्यातील विविध भागांतून हजारो मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व जारंगे करत आहेत.
आंदोलनस्थळाजवळील शौचालये मुद्दाम बंद ठेवण्यात आली होती आणि नाश्ता व पाणी विकणाऱ्या दुकानेही बंद करण्यात आली होती असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता की, आझाद मैदान आणि परिसरातील सर्व ‘पे-ॲण्ड-यूज’ शौचालये आंदोलनकर्त्यांसाठी मोफत खुली करण्यात आली आहेत असे महापालिकेने आता स्पष्ट केले आहे.
पालिकेने सांगितले की, 300 हून अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून ती पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छतेसाठी ही शौचालये नियमित साफ केली जात आहेत, असेही सांगण्यात आले.
याशिवाय, आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी जवळपास 800 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली.
आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निरनिराळ्या सेवा
प्रखर झोत विद्युत दिवे
पाणी टँकर्स
सतत स्वच्छता
वैद्यकीय मदत
मोफत शौचालये
धूम्रफवारणी
नागरी सोयी – सुविधांसाठी #mybmc सदैव तत्पर!
@CMOMaharashtra@mieknathshinde… pic.twitter.com/7m0p5RJrIs
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 30, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List