‘डीजेमुक्त सोलापूर’साठी फक्त एक मिस कॉल द्या

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी फक्त एक मिस कॉल द्या

डीजेच्या आजारपणातून सोलापूरला मुक्त करण्यासाठी ‘फक्त एक मिस कॉल द्या’, अशी हाक वीरशैव व्हिजन व डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती ‘वीरशैव व्हिजन’चे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुल व कृती समितीचे अध्यक्ष ऍड. धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या सोलापुरात नोकरी-रोजगाराच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिणामी सोलापुरातील तरुण पुणे, मुंबई, बंगळुरू अशा मोठय़ा शहरांत कायमस्वरूपी स्थलांतरित होत आहेत. हे रोखण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात सोलापुरात विधायक कार्याऐवजी, पारंपरिक वाद्यांऐवजी तरुणांना डॉल्बी डीजेची आवड लागली आहे.

सोलापुरात होणाऱया विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱया डीजे डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या, हृदयाच्या, मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर आणि घातक आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना, गर्भवती महिलांना मोठय़ा आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ‘सोलापूर डीजेमुक्त क्हावे,’ अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. त्यांची इच्छा मिस कॉलच्या रूपात आमच्यापर्यंत पोहोचेल. जितक्या नागरिकांकडून मिस कॉल येतील, तेवढी संख्या पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात येऊन डीजे बंदीची मागणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाला ‘वेकअप सोलापूर डिजिटल मॅगझिन’चे संचालक राहुल शेटे यांचे सहकार्य लाभले आहे. कॉल केल्यानंतर मेसेज येणार आहे. ज्यांचा डीजेला विरोध आहे, त्यांनी 9168729729 या क्रमांकाकर मिस कॉल द्यावा, असे आवाहन वीरशैक व्हिजन व डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला असीम सिंदगी, कौस्तुभ करवा, राहुल शेटे, विजयकुमार बिराजदार, अमित कलशेट्टी, धानेश सावळगी, सोमनाथ चौधरी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका…. तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका….
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहाराकडे...
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानींसह स्थलांतरितांविरुद्ध प्रदर्शनं, काय आहे कारण? वाचा…
उकडलेले मशरूम आणि अंड्यांपासून बनवा ही खास रेसिपी, या टिप्स फॉलो करा
कच्चं गाजर खाणं आवडत नाही? मग अशाप्रकारे तयार करा त्याचं सूप
पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का?
नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो का?
Ratnagiri News – आरवलीजवळ मिनी बसची कारला टक्कर, 4 जण जखमी