Pandharpur News – ज्येष्ठा गौरी आवाहननिमित्त श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला अलंकार परिधान
ज्येष्ठा गौरी आवाहननिमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचा कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, मोहनमाळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ, नाम निळाचा तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.
याशिवाय, आज राधाष्टमी (श्री राधिका मातेचा जन्म दिवस) असल्याने मंदिरातील श्री राधिकामातेस पांढरा पोशाख व सोन्या मोत्याचे अलंकार परिधान करण्यात आले होते. यानंतर गुलाल टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये सोन्याचा नक्षी टोप, मोत्याचा कंठा, खड्याचा पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, बाजीराव गरसोळी इत्यादी अलंकाराचा समावेश आहे. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.प्रकाश जवंजाळ व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. तसेच रात्री 8.00 वाजता श्री राधिकामाते समोर भजन केले जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List