जेव्हा तुम्हाला दर चौथ्या दिवशी दाढी रंगवायला लागते…, विराट कोहलीने सांगितलं कसोटीतून निवृत्तीचं मजेशीर कारण

जेव्हा तुम्हाला दर चौथ्या दिवशी दाढी रंगवायला लागते…, विराट कोहलीने सांगितलं कसोटीतून निवृत्तीचं मजेशीर कारण

विराट कोहलीने आपली कसोटी कारकीर्द गाजवल्यानंतर 12 मे 2025 रोजी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळेच विराटच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला होता. त्याने आता निवृत्तीचं मजेशीर कारण सांगितलं आहे.

विराट कोहली पत्नी अनुष्कासह सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील सामना बघण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला कसोटी निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तसेच त्याला सर्वजण मैदानावर मिस करत असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. तेव्हा विराट कोहली म्हणाला की, “मी माझ्या दाढीला दोन दिवसांपूर्वी कलर मारला आहे. जेव्हा तुम्हाला दर चौथ्या दिवशी दाढीला कलर मारावा लागत असेल, तेव्हा समजून गेलं पाहिजे की आता वेळ आली आहे.” अशा मजेशीर अंदाजात त्याने निवृत्तीच्या प्रश्नावर उत्तर दिल. यावेळी विराट कोहली सोबत रवी शास्त्री सुद्धा होते. यावेळी त्याने बोलत असताना रवी शास्त्री यांचे आभार मानले. तसेच रवी शास्त्री माझ्या संपूर्ण प्रवासात महत्त्वपूर्ण भाग राहिले आहे. माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम असेल, अशा भावना त्याने रवी शास्त्रींबद्दल बोलताना यावेळी व्यक्त केल्या.

गुरू आचरेकरांना वंदन करण्यासाठी शिष्य जमणार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लोणावळा-खंडाळाला हिल  स्टेशनचा दर्जा देण्याचा विचार करा,  हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना; नंदनवन हरवत चालल्याची खंत लोणावळा-खंडाळाला हिल स्टेशनचा दर्जा देण्याचा विचार करा, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना; नंदनवन हरवत चालल्याची खंत
लोणावळा-खंडाळाला हिल स्टेशनचा दर्जा देण्याचा विचार राज्य शासनाने करावा, जेणेकरून येथील बांधकाम व अन्य सुविधांसाठी स्वतंत्र विशेष नियम लागू करता...
माजी खासदाराच्या मुलाची 127 कोटींची संपत्ती जप्त
सरकारला काळ माफ करणार नाही, कंत्राटदार महासंघाने हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे दिले पुरावे
मंदिराचा वाद पेटला! थायलंडचा कंबोडयावर हवाई हल्ला!! 12 नागरिकांचा मृत्यू, 40 हजार लोकांचे स्थलांतर
निशिकांत दुबे यांच्या पत्नीवर गुन्हा, कोटय़वधींचे कर्ज बुडवले!
आठ विकेट पडणार! मंत्रिमंडळात होणार फेरबदल!! मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत, ‘हे’ मंत्री हिटलिस्टवर
इजा, बिजा आणि आता तिजाही झाले! कोकाटेंचा सोमवारी फैसला अजितदादांनी भेटायला बोलावले