आकाशवाणी निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित, एफडीएची कारवाई

आकाशवाणी निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित, एफडीएची कारवाई

मिंधे गटाचेआमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला निकृष्ट जेवणावरून मारहाण केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तात्काळ कारवाई केली. एफडीएने यावर कारवाई करत कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित केला आहे. तसेच अजंता कॅटरर्सच्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.

दरम्यान, संजय गायकवाड हे सध्या विधी मंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत आले आहेत. ते आमदार निवासात राहत असून मंगळवारी त्यांनी तिथल्याच कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. मात्र त्या जेवणातील डाळीला वास येत असल्याने संजय गायकवाड हे थेट बनियन टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला बोलावले व डाळीबाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. यावेळी आमदारांसोबत असलेल्या काही लोकांनी देखील संधी साधत कॅन्टीन ऑपरेटवर हात साफ केला. या घेतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Diabetes : डायबिटीजपासून सावध! शुगर पातळीवरून समजून घ्या ‘धोक्याची घंटा’ Diabetes : डायबिटीजपासून सावध! शुगर पातळीवरून समजून घ्या ‘धोक्याची घंटा’
डायबिटीजसारख्या गंभीर आजाराबद्दल प्रत्येकाला योग्य माहिती असणं आवश्यक आहे. रक्तातील साखरेचं (ब्लड शुगर) प्रमाण किती असलं की ते सहज, नॉर्मल...
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचे ‘ही’ लक्षणे समजून घ्या, त्वरीत करा उपाय
तिलक वर्माची सुस्साट फलंदाजी; चौकार अन् षटाकारांचा धुरळा उडवत इंग्लंडमध्ये ठोकलं सलग दुसर शतकं
Jammu Kashmir – जम्मू-कश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, एक जवान शहीद; तीन जखमी
उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
पंतप्रधान मोदी म्हणजे मीडियाने फुगवलेला फुगा, राहुल गांधी यांची सडकून टीका
Operation Sindoor वर संसदेत पहिल्यांदाच सरकारने दिलं उत्तर, परराष्ट्र राज्यमंत्री काय म्हणाले? वाचा…