हिंदुस्थानी वंशाचे साबीह खान Apple चे नवे COO, संभाव्य वार्षिक वेतन 190 कोटी रुपये!

हिंदुस्थानी वंशाचे साबीह खान Apple चे नवे COO, संभाव्य वार्षिक वेतन 190 कोटी रुपये!

मोबाईल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात दबदबा असलेली Apple कंपनी पुन्हा चर्चेत आहेl. Apple ने कंपनीचे नवीन सीओओ (Chief Operating Officer) म्हणून सबीह खान यांची नियुक्ती केली आहे. हिंदुस्थानी वंशाचे साबीह खान हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे आहेत.

मस्क यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची घसरण, जिगरी दोस्त दुश्मन बनल्याने आर्थिक फटका

कोण आहेत साबीह खान?

साबिह खान 1995 पासून Apple संबंधित आहेत. म्हणजेच गेल्या 30 वर्षांपासून ते या कंपनीत काम करत आहेत. कंपनीचे कामकाज आणि उत्पादन यंत्रणा इतक्या उत्तम प्रकारे हाताळली आहे की, स्वतः Appleचे सीईओ टिम कुक त्यांच्या कामाचे स्तुती करतात. आता त्यांना कंपनीचे नवीन ऑपरेशन्स हेड म्हणजेच सीओओ बनवण्यात आले आहे. सबीह खान यांनी अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि नंतर एमबीए केले. त्यांचे शालेय शिक्षण हिंदुस्थानातच झाले.

अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी गुगलला महागात, युजर्सना मिळणार 2600 कोटी रुपयांची भरपाई

साबीह खान यांच्या आधी Apple चे सीओओ जेफ विल्यम्स यांना मूळ वेतन 1 दशलक्ष डॉलर (सुमारे 8 कोटी रुपये) मिळत होते. बोनस आणि इतर सुविधा जोडल्यानंतर त्यांची एकूण कमाई सुमारे 23 दशलक्ष डॉलर (सुमारे 191 कोटी रुपये) पर्यंत पोहोचत होती. असे म्हटले जातेय की, सबीह खानचे वेतनही याच्या आसपास असू शकतो. परंतु Apple ने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

साबीह एक हुशार रणनीतिकार – टीम कुक

साबीह एक हुशार रणनीतिकार आहे जो Apple च्या पुरवठा साखळीच्या मुख्य शिल्पकारांपैकी एक आहे. अ‍ॅपलची पुरवठा साखळी पाहता साबीहने प्रगत उत्पादनात, नवीन तंत्रज्ञानाचा पाया रचण्यास मदत केली आहे. अमेरिकेत अ‍ॅपलच्या उत्पादनाचा विस्तार करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. आणि जागतिक आव्हानांचा सामना करताना Apple ला बळकट करण्यास मदत केली आहे, अशी प्रतिक्रिया साबीह यांच्या नियुक्तीवर कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाभीमध्ये तेल टाकण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? नाभीमध्ये तेल टाकण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणं महत्त्वाचे असते. शरीराशी संबंधित लहान-मोठ्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी नाभीला तेल लावण्याचा सल्ला तुम्ही...
कला केंद्रातील गोळीबारप्रकरणी आमदाराच्या भावासह चौघांना अटक
साई संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
बुद्धिबळपटावर हिंदुस्थानचा विश्वविजय, अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख भिडणार
क्रिकेटवारी – ऋषभ, तुझे सलाम!
हिंदुस्थानच्या ‘कसोटी’नंतर इंग्लंडचे ‘बॅझबॉल’ , पहिल्या डावात हिंदुस्थानच्या 358 धावा; इंग्लंडच्या सलामीवीरांची आक्रमक शतकी खेळी
मराठी बोलतो, असे सांगणाऱया विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला, वाशीतील आयसीएल कॉलेजच्या गेटवर घडला संतापजनक प्रकार