महाराष्ट्रात मराठीच बोलायचं! लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांत राडा
मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये मराठी भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मराठी आणि अमराठी भाषिक महिलांमध्ये बाचाबाची झाली. महाराष्ट्रात मराठीच बोलायचं, अन्यथा इथून निघायचं, असा सज्जड दम देत महिला प्रवाशांनी लोकल प्रवासात मराठी हिसका दाखवला.
शुक्रवारी सायंकाळी डाऊन मार्गावर हा प्रकार घडला. ‘पीक अवर्स’मुळे लोकल ट्रेन प्रचंड गर्दीने भरली होती. या गर्दीत सीट मिळवण्याच्या प्रयत्नात महिलांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हिंदी भाषिक महिलेने ‘मराठीत का बोलतेस?’ अशी विचारणा करताच भांडणाचा भडका उडाला आणि महिला एकमेकांवर अक्षरशः तुटून पडल्या. मराठी भाषेचा विषय निघाल्याने जवळपास सहा ते सात महिला त्वेषाने उभ्या ठाकल्या आणि त्यांनी मराठी हिसका दाखवला. दरम्यान, रेल्वे पोलीस आणि आरपीएफने या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List