भाजपशासित बेळगाव पालिकेतून मराठी हटवली; सक्तीचे कानडीकरण, भगवा ध्वजही काढला, मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप

भाजपशासित बेळगाव पालिकेतून मराठी हटवली; सक्तीचे कानडीकरण, भगवा ध्वजही काढला, मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप

कोल्हापूर बेळगावसह सीमाभागात कानडीकरणाच्या सक्तीचा वरवंटा फिरवला जात असून, मराठी भाषिकांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे. भाजपची सत्ता असलेल्या बेळगाव महापालिकेतून मराठी भाषाच हटविली जात आहे. सर्व कागदपत्रे, व्यवहाराची भाषा फक्त कन्नड करण्याचा फतवा काढला आहे. महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवरील नामफलक कन्नडमध्ये केले. तसेच वाहनांवरील भगवा ध्वजही हटविण्यात आला आहे. दरम्यान, कन्नड सक्तीमुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बेळगाव महापालिकेत कन्नड विकास प्राधिकरणाची आढावा बैठक झाली. प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले, सचिव संतोष हनगल यांनी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड सक्तीची अंमलबजावणी करावी. जनतेलाही कन्नड भाषेतच सेवा पुरवल्या पाहिजेत, अशा सूचना केल्या. सर्व नामफलक, कागदपत्रे कन्नड भाषेत करण्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू केली. अंगणवाडी स्तरापासून सर्व सरकारी कार्यालयांत व्यवहाराची भाषा कन्नड ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सक्तीचे कानडीकरण

बेळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, मंगेश पवार हे महापौर आहेत. महापालिकेत राजरोसपणे कानडीकरण करण्यात येत असताना महापौर पवार आणि भाजप नगरसेवकांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

वृत्तपत्रांवर कारवाई

कन्नड विकास प्राधिकरणाने कन्नडविरोधी लिखाण करणाऱया मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याच्या सूचना बेळगाव जिल्हाधिकाऱयांना दिल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले यांनी सांगितले.

मराठी घरात बोला

जर कोणी कन्नड बोलत नसेल तर संबंधित कर्मचाऱयांना नोटीस देऊन कारवाई केली जाईल. ‘तुमची भाषा मराठी असेल तर तुमच्या घरात बोला’ अशा सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.

त्रिभाषा सूत्राला हरताळ

बेळगाव महापालिकेने अनेक वर्षांपासून मराठी, कन्नड आणि इंग्रजी असे त्रिभाषा धोरण स्वीकारले आहे. आजपर्यंत महापालिकेतील सर्व विभागांची कागदपत्रे, नामफलक या तिन्ही भाषेत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता असेपर्यंत हे त्रिभाषा सूत्र जपण्यात आले. मात्र, भाजपची सत्ता महापालिकेत आल्यानंतर मराठी भाषाच हटविली जात असून, झपाटय़ाने कानडीकरण सुरू आहे. कन्नड विकास प्राधिकरणाच्या बैठकीनंतर महापालिकेतील फलक, कागदपत्रे कन्नड भाषेत करण्यात येत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!