एक लाख भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

एक लाख भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्या अन् पालख्यांचा सोहळा सोलापूर जिह्याच्या वेशीवर विसावला असून पंढरीनगरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेली आहे. चंद्रभागा नदीचे स्नान करून भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे. एका मिनिटामध्ये तीस भाविकांना पदस्पर्श दर्शन दिले जात असल्याने दिवसभरात चाळीस हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन आणि साठ हजार भाविकांना मुखदर्शन असा एक लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मठ, धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;