तिबेटच्या मुद्यांवर सावधगिरी बाळगा; रिजिजू यांच्या विधानानंतर चीनने हिंदुस्थानला सुनावले

तिबेटच्या मुद्यांवर सावधगिरी बाळगा; रिजिजू यांच्या विधानानंतर चीनने हिंदुस्थानला सुनावले

बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचे उत्तराधिकारी कोण असणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान हिंदुस्थानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दलाई लामा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावर चीन संतापला आहे. दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे, असे रिजिजू गुरुवारी म्हणाले होते. त्यावर तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर हिंदुस्थानने सावधगिरी बाळगावी, असे सुनावत चीनने शुक्रवारी रिजिजू यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला.

केवळ दलाई लामा व त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेलाच तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक प्रमुख म्हणून त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे, असे विधान रिजिजू यांनी गुरुवारी केले. त्यांचे हे विधान चीनच्या दीर्घकाळापासूनच्या भूमिकेला छेद देणारे आहे. या पार्श्वभूमीवर चीनने हिंदुस्थानला प्रत्युत्तर दिले आहे. रिजिजू यांनी केलेल्या विधानांचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो. संभाव्य प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी हिंदुस्थानने आपल्या भाषेत आणि कृतीत सावधगिरी बाळगावी, असा इशारा चीनने दिला आहे.

रिजिजू यांच्या भूमिकेला परराष्ट्र मंत्रालयाने विरोध दर्शवला आहे. भारत सरकार श्रद्धा आणि धर्माच्या प्रथांबद्दल कोणतीही भूमिका घेत नाही किंवा बोलत नाही. सरकारने नेहमीच देशातील सर्वांसाठी धर्म स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. यापुढेही तशाच प्रकारे समर्थन केले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;