पिंपरी-चिंचवडमध्ये भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हा; सचिन अहिर यांचे आवाहन
पिंपरी- चिंचवड महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी केले. काळेवाडीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख लतिका पाष्टे, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील, सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, दस्तगीर मणियार, महिला शहर संघटिका रूपाली आल्हाट, जिल्हा समन्वयक सुशीला पवार, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, माजी नगरसेविका मीनल यादव, वैशाली कुलते, नीलम म्हात्रे, वैशाली काटकर, वैभवी घोडके, तस्लीम शेख, सुषमा शेलार, कामिनी मिश्रा, श्रद्धा शिंदे, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, राजाराम कुदळे, संतोष वाळके, युवराज कोकाटे, तुषार नवले, एकनाथ हाके, दिलीप भोंडवे, किरण दळवी, गोरख नवघणे, गणेश आहेर, संतोष म्हात्रे, पांडुरंग पाटील, भाविक देशमुख, संदीप भालके, ज्ञानेश्वर शिंदे, विकास भिसे, मनोहर कानडे, राजू सोलापुरे, दीपक भक्त उपस्थित होते. लतिका पाष्टे यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन विभागप्रमुख गोरख पाटील यांनी केले. चिंचवड विधानसभाप्रमुख हरेश नखाते यांनी आभार मानले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List