भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी… हिंदी सक्तीवरून अंबादास दानवे यांचा जोरदार टोला
हिंदी सक्तीबाबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निर्णय घेतला होता असा अपप्रचार भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला होता. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासासाठी कार्यबल गठीत करण्यात आला होता. यात हिंदीचे ‘ह’ पण नाही अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते ते गल्लीत फिरणाऱ्या भक्तांनी खालील शासन निर्णयाचा कागद डोळे फाडून वाचून घ्यावा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासासाठी कार्यबल गठीत करण्यात आला होता. यात हिंदीचे ‘ह’ पण नाही. भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी या यादीत समाविष्ट लोकांची नावे देखील वाचावीत. दिल्लीचे फर्मान अंमलात आणण्याची सवय तुमची आहे, आमची नाही. बाकी तुमच्या सर्व थोतांडांना 5 जुलै रोजी उत्तर देऊच असेही अंबादास दानवे म्हणाले.
सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते ते गल्लीत फिरणाऱ्या भक्तांची खलील शासन निर्णयाचा कागद डोळे फाडून वाचून घ्यावा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासासाठी कार्यबल गठीत करण्यात आला होता. यात हिंदीचे ‘ह’ पण नाही. भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी या यादीत समाविष्ट लोकांची नावे देखील… pic.twitter.com/wrcKXqURcy
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 1, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List