शहरातील 32 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

शहरातील 32 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर वाहतुकीच्या सोईसाठी 32 ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारले आहेत. यामधील दापोडीतील हॅरिस पुलाला तब्बल 130, चिंचवड येथील चिंचवड रेल्वे पुलाला 47 तर पिंपरीतील इंदिरा गांधी पुलाला 42 वर्षे झाल्याची बाब समोर आली आहे. हे तिन्ही पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यानंतर यांचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक लेखापरीक्षण)करून दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, इंद्रायणी नदीवरील पुंडमळा येथील पूल दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. राज्य सरकारच्या आदेशनानंतर शहरातील सर्वच पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वसले आहे.शहराच्या चोहोबाजूस ये-जा करण्यासाठी तसेच, सुरळीत रहदारीसाठी महापालिकेने प्रशस्त रस्त्यांसोबत उड्डाणपूल बांधण्यास सुरूवात केली. 2004 मध्ये महापालिकेने निगडी, टिळक चौकातील पै. महापौर मधुकर पवळे हा पहिला उड्डाणपूल उभारला. त्यानंतर शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवर अनेक ठिकाणी पूल बांधले आहेत. तसेच रेल्वे मार्ग, चौक आणि महामार्गावर उड्डाणपूलउ भारले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;