माझी मातृभाषा अस्सल मराठी, भाषावाद हा जाणून बुजून निर्माण केलेला वादंग! अमोल पालेकर
अमोल पालेकर हिंदी सिनेसृष्टीतील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व.. पालेकर यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सहजपणा आणि संवेदनशीलपणा. अमोल पालेकरांची ओळख ही समस्त हिंदी चित्रपटसृष्टीत एका वेगळ्या धाटणीचा कलाकार म्हणून आहे. त्यांनी कायमच आपल्या नैसर्गिक अभिनयशैलीने सर्वांचेच मन जिंकले. त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि अनोख्या दिग्दर्शन शैलीने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन दिशा दिली.
नुकत्याच डेहराडून मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मातृभाषेविषयी म्हणजे मराठीविषयी गौरवोद्गार काढले होते. होय माझी मातृभाषा अस्सल मराठी आहे असे म्हणत त्यांनी केलेली कार्यक्रमाची सुरुवात चांगलीच गाजली होती.
आम्ही दोघेही म्हणजेच मी व माझी पत्नी अस्सल मराठी आहोत. मला अनेकांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना, माझे नाव बदलण्याचा सल्ला दिला. परंतु मी मात्र ती गोष्ट अमान्य केली. भाषावाद हा जाणून बुजून केलेला वादंग आहे. मी आणि माझी पत्नी संध्या याचा विरोध करत आहोत. आम्ही हिंदुस्थानी असल्याचं आम्ही गर्वाने सांगतो. आपल्या हिंदुस्थानात प्रत्येक नागरिकाच्या भाषेचा चांगला मान सन्मान राखला जातो. याच सर्वसमावेशकतेचा आम्ही आदर करतो.
दैनिक जागरणने आयोजित केलेल्या ‘अमोल की अमानत’ यामध्ये अमोल पालेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. यामध्ये त्यांनी ‘गोलमाल’, ‘बातो बातो में’, ‘छोटी सी बात’, ‘चित्तचोर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यानंतर आलेल्या चढ-उतारांबद्दल त्यांनी मन मोकळेपणाने संवाद साधला. दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘पहेली’, ‘थोडा सा रोमँटिक हो जायें’ चित्रपटातील पडद्यामागे राहिलेल्या पैलूंवरही चर्चा केली. त्यांच्या ताकदींसोबतच त्यांनी त्यांच्या कमतरताही जाहीरपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List