उत्तराखंड, हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 200 हून अधिक पर्यटक अडकले
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झाल्याने, आता पर्यटक अडकल्याची घटना समोर आलेली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 200 पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य पर्यटक हे पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात गेले होते, परंतु ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसामुळे पर्यटकांची कोंडी झालेली आहे. वाहनांच्या लागलेल्या लांबच रांग रांगामुळे पर्यटकांचे चांगलेच हाल होत होते.
महाराष्ट्रातील अडकलेले काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजते. मात्र यासंदर्भामध्ये प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. अडकलेल्या पर्यटकांची अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. सोमवारी (30 जून) हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुसंख्य भागात भूस्खलन झाले आहे. यामध्ये काही इमारती कोसळल्या असून, बहुतांशी रस्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे अनेक छोट्या गावांचा संपर्कही तुटलेला आहे.
ढगफुटीमुळे हिमाचलच्या मंडीमध्ये प्रचंड नुकसान, शाळा-महाविद्यालये बंद, 1 मृत, 7 बेपत्ता
हिमाचलमध्ये पावसामुळे आत्तापर्यंत एकूण 39 जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या 24 तासांत 3 जणांनी मुसळधार पावसामुळे प्राणही गमावला आहे. मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील थलौतच्या भुभू जोत बोगद्याजवळ भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे रस्ते वाहतूक चांगलीच ठप्प झालेली आहे. हिमाचलच्या 4 जिल्ह्यांमधील शाळा मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ढगफुटी आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. रस्ते बंद झाले आहेत आणि शेकडो यात्रेकरू अडकले आहेत. यमुनोत्री धाममध्ये अडकलेल्या 600 हून अधिक यात्रेकरु अडकले आहेत.
बुधवारी हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आणि 6 जुलैपर्यंत डोंगराळ राज्यात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांच्या काही भागात पुढील 24 तासांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अलकनंदा नदीमध्ये 15 फूट उंच शिवमूर्ती पाण्याखाली गेली असून, कुठे भूस्खलन तर कुठे ढगफुटी सुरु आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List