फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावताहेत स्कूल बस

फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावताहेत स्कूल बस

शाळा सुरू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातून नोंदणीकृत ३ हजार १९५ स्कूलबसपैकी २ हजार ४८४ स्कूल बसचालकांनी फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) घेतले आहे. सध्या ७११ बस फिटनेस सर्टिफिकेट नसताना धावत आहेत. सर्टिफिकेट फिटनेस नसताना स्कूल बस रस्त्यावर दिसल्यास त्या चालकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची प्रवासी क्षमता दीडपट असते. त्याहून अधिक मुलांना बसवून दाटीवाटीतून ने-आण करणाऱ्या चालकाला दंड करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. मुले ज्या वाहनातून शाळेत ये-जा करतात, त्या वाहनाबाबत नियमावली प्रत्येक शाळेतील स्कूल बस कमिटी व पालकांना माहिती असणे गरजेचे आहे.

स्कूल बससाठी नियमावली पुढीलप्रमाणे 
प्रथमोपचार साहित्य व औषधे उपलब्ध असावीत, अधिकृत संस्थेची प्रमाणित ५ किलोग्रॅम वजनाचे दोन अग्निशमन यंत्रे (एक चालक कक्षात व दुसरे संकटसमयी बाहेर पडावयाच्या मार्गाजवळ) बसवणे बंधनकारक आहे. बसच्या खिडक्यांना तीन आडव्या दांड्या असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर ५ सेमीपेक्षा अधिक असू नये. मुलांच्या बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी, बसची सर्व आसने समोरील बाजू असावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. शालेय बसवर कोणतीही व्यावसायिक जाहिरात नसावी. स्कूल बसची यांत्रिक स्थिती उत्तम असावी. आरटीओकडील योग्यता प्रमाणपत्र त्यांच्याकडे बंधनकारक आहे.

स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असतील तसेच बसेसच्या पुढे व मागे १ शालेय बस असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे. मोठ्या आवाजाचे हार्न नसावेत. स्कूल बस नोंदणीपासून १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी. मुंबईत ही मर्यादा ८ वर्षे आहे. तर, सीएनजी बससाठी ही मर्यादा १५ वर्षे आहे. प्रत्येक बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, रक्तगट, बसमध्ये चढण्याचे व उतरण्याचे ठिकाण व मार्ग दर्शविणारे विवरणपत्रक उपलब्ध असावे. मुंबईवगळता इतर महापालिकांच्या क्षेत्रात बसचा वेग ताशी ५० किमी निश्चित आहे. शाळेचे नाव, मार्ग क्रमांक लिहिलेले दोन फलक आवश्यक आहेत.

फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक असून, नियमावलीचे पालन करावे. आपल्या भरवशावर चिमुकली वाहनातून घरी जात आहेत, याचे भान चालकांनी ठेवावे. पाच महिन्यांत २४२ स्कूलबस व इतर ६४ वाहनांवरील कारवाईत २५ लाख ३३ हजारांचा दंड वसूल केला आहे.
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

कर्मचाऱ्यांसाठीची नियमावली
चालक प्रशिक्षित असावा. बसमध्ये एक पुरुष-एक महिला परिचर असावी. विद्यार्थी बसमध्ये चढ-उतार करताना त्यांच्या सुरक्षिततेकडे त्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. चालकास ५ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव बंधनकारक आहे. वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्यात त्यास दंड झालेला नसावा. वाहतुकीचा परवाना, बिल्ला त्याच्याकडे हवाच. बसमध्ये धूम्रपान नको. बस चालू झाल्यावर दरवाजे बंद असावेत. बसमध्ये कोणतेही संगीत लावू नये. कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही खाद्यपदार्थ अथवा पेय देऊ नये. बसथांब्यांवर अधिकृत व्यक्ती हजर नसल्यास विद्यार्थ्यास शाळेत परत आणावे आणि पालकांना बोलावून त्यांच्याकडे सोपवावे, बसमधील सर्व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावे, स्वच्छ गणवेश व सर्व कर्मचाऱ्यांना मराठी-हिंदी-इंग्रजीचे ज्ञान असावे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखरेचा निरोप हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखरेचा निरोप
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात 15 जून रोजी जयपूरचे राजवीर सिंह यांचे निधन झाले. जयपूरमधील चांदपोल मोक्षधाम येथून त्यांची अंतिम यात्रा मंगळवारी...
कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका
Kitchen Cleaning Tips- किचन चकाचक ठेवण्यासाठी या वस्तू तुमच्या घरी असायलाच हव्यात
राजा रघुवंशीच्या हत्येला काळ्या जादूचे वळण, वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती
रात्री झोप येत नसेल तर तुमच्या आहारात ‘या’ पाच पेयांचा करा समावेश
सकाळी उठल्यानंतर किती ग्लास पाणी पिणे शरीरासाठी ठरेल फायदेशीर, आहार तज्ज्ञांकडून जाणून घ्या
नितेश राणेंचा पोपट झाला रे, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांचा टोला