‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण

‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण

‘आय लव्ह यू’ म्हणणे ही भावनांची अभिव्यक्ती आहे, गुन्हा नाही. कुणी केवळ ‘आय लव्ह यू’ म्हटले, तर त्यातून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही, असे महत्वपूर्ण निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. 2015 मध्ये किशोरवयीन मुलीची छेड काढल्याच्या आरोपाखाली 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्या तरुणाने तक्रारदार मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. मात्र त्यावरुन तक्रारदार मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा हेतू सिद्ध होत नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

आरोपी तरुणाने नागपूर येथील 17 वर्षीय मुलीचा हात धरला होता आणि तिला उद्देशून ‘आय लव्ह यू’ असे म्हटले होते. याप्रकरणी नागपूरच्या सत्र न्यायालयाने 2017 मध्ये आरोपी तरुणाला भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द केली. मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणण्यामागे तरुणाचा खरा हेतू त्या मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा होता हे दर्शविणारी कोणतीही परिस्थिती दिसून येत नव्हती. आरोपीने लैंगिक हेतूने मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही, असेही निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी तरुणाला दिलासा दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेसिकाचा सलामीलाच गेम फिनिश; इटलीच्या एलिसाबेटाने सरळ सेटमध्ये हरविले जेसिकाचा सलामीलाच गेम फिनिश; इटलीच्या एलिसाबेटाने सरळ सेटमध्ये हरविले
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली अमेरिकन टेनिसपटू जेसिका पेगुलाचा विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या सलामीलाच गेम फिनिश झाला. 116व्या मानांकित इटलीच्या...
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चंदिगड, हरयाणा अजिंक्य
नव्या राष्ट्रीय क्रीडा धोरणाला मंजुरी
क्रिकेटवारी – बॅझबॉल चक्रावून गेलाय!
ते गेल्या 58 वर्षांत एकदाही घडलेलं नाही…
इंग्लंडला रोखण्यासाठी हिंदुस्थानचे फिरकी अस्त्र; जाडेजा, सुंदर आणि कुलदीपपैकी दोघांना संधी
हिंदुस्थानचा बांगलादेश दौरा दूरच