अनियंत्रित भरधाव कार थेट कालव्यात कोसळली; दोघांचा मृत्यू, तिघांचा शोध सुरू

अनियंत्रित भरधाव कार थेट कालव्यात कोसळली; दोघांचा मृत्यू, तिघांचा शोध सुरू

अनित्रित भरधाव कार कालव्यात कोसळल्याची घटना मंगळवारी गुजरातमध्ये घडली. आतापर्यंत दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

गांधीनगरमधील नाभोई कालव्यात मंगळवारी दुपारी किआ सेल्टोस कार कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार अचानक पलटी झाली आणि कालव्यात पडली. कारमध्ये पाच जण होते. कालव्यात पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. बचाव पथक आणि अग्नीशमन दलाने आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बचाव उपकरणांचा वापर करून कार कालव्यातून बाहेर काढण्यात आली. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;