हे करून पहा – प्रवासात उलटी होत असेल तर…
प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलटय़ा होण्याची समस्या म्हणजे मोशन सिकनेस. प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान आल्याचे लहान तुकडे किंवा आल्याची पँडी चघळल्याने मळमळ कमी होते.
लिंबू उलटीची शक्यता कमी करते. प्रवासादरम्यान लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत प्यायल्याने आराम मिळतो. वेलची खाणे फायदेशीर ठरते.
बडीशेपदेखील मळमळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रवासादरम्यान बडीशेप चघळल्याने किंवा बडीशेपचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो. प्रवासाला निघण्यापूर्वी हलके आणि सहज पचणारे अन्न खा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List