शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, महायुती सरकारला नाना पटोलेंनी सुनावले खडेबोल

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, महायुती सरकारला नाना पटोलेंनी सुनावले खडेबोल

भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

शेतकरी प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर नाना पटोले यांना विधिमंडळातून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले, त्यानंतर विधिमंडळ परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. भाजपा युती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान करतात, आधी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. नंतर कर्जमाफीचे पैसे मुलामुलींच्या लग्नाला वापरा, अशी वायफळ बडबड केली तर आता बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतात, शेतकऱ्यांच्या घरच्यांना कपडे, मोबाईल हेही मोदी देतात असे विधान केले. 2014 च्या आधी लोणीकर कपडे घालत नव्हते काय?, नंगे फिरत होते का?, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतमालाला हमी भाव देऊ, शेतीला 24 तास मोफत वीज देऊ अशी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि आता शेतकऱ्यांचा अपमान करतात. हा सत्तेचा माज आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. शेतकऱ्यांची लढाई लढत राहणार, आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न डगमगता शेतकऱ्यासाठी लढत राहू. शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर व मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तान बनला UNSC चा अध्यक्ष! हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब? पाकिस्तान बनला UNSC चा अध्यक्ष! हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब?
मंगळवारी पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा...
कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय?
‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण
Maharashtra Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी गदारोळ; विरोधकांचा सभात्याग
Photo – अकलुज येथे संत तुकारम महाराज पालखीचा रिंगण सोहळा भक्तीभावात संपन्न
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
Ratnagiri News: रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचे नाशिक कनेक्शन? बेपत्ता तरुणीचे वडील उद्या रत्नागिरीत येणार