Cigarette : सिगारेटची हवेत वर्तुळं सोडताय? केवळ कॅन्सरच नाही, तर या अनेक घातक आजारांचा धोका, आताच सावध व्हा

Cigarette : सिगारेटची हवेत वर्तुळं सोडताय? केवळ कॅन्सरच नाही, तर या अनेक घातक आजारांचा धोका, आताच सावध व्हा

धूम्रपान हे एक हळूहळू पसरणारे विष आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, दरवर्षी जगभरात लाखो लोक धुम्रपानामुळे मृत्युमुखी पडतात. फुफ्फुस कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जमाल ए खान यांच्या मते, सिगरेट ओढण्यामुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होतो. त्यात दरवर्षी 70 लाख लोकांचा जीव जातो. पण धुम्रपानाचा अर्थ केवळ फुफ्फुसाचा कर्करोग होणे असा नाही, तर शरीरात गंभीर रोगांना आमंत्रण देणे आहे. तंबाखू आणि निकोटिन शरीरातील जवळपास सर्वच अवयवांवर परिणाम करतात.

फुफ्फुसाचा कर्करोग : या कर्करोगाने सर्वाधिक लोक मरतात. त्यातील 90 टक्के प्रकरणं ही धूम्रपानाशी निगडीत आहे. सीडीसीनुसार, धुम्रपान करणाऱ्यांमध्ये त्याचे प्रमाण व्यसन न करणाऱ्यांपेक्षा 15-30 पट अधिक आहे. त्यात हजारोंचा बळी जातो.

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज: सीओपीडीशी संबंधित ९०% मृत्यू धूम्रपानामुळे होतात. हा फुफ्फुसांचा एक गंभीर आजार आहे. त्यात श्वास घेताना त्रास होतो. हे मृत्यूचे मोठे कारण आहे. धुम्रपानामुळे फुफ्फुसांची क्षमता घटते.

हृदयाचा विकार : धूम्रपानामुळे आपल्या शरीरातील हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्तपेशींचे नुकसान होते. सिगारेटमधील घातक रसायने आणि टार यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो. ते जमा झाल्याने रक्तप्रवाहाला अडथळा येतो. नंतर ब्लॉकेज होऊ शकते.

प्रजनन क्षमतेवर परिणाम : धूम्रपान सेवन करणाऱ्या स्त्रियांच्या प्रजनन संस्थेला इजा होऊ शकते. गरोदरपणात समस्या येऊ शकतात. सिगारेटमधील तंबाखू आणि इतर रसायनांच्या हार्मोन्सवर परिणाम दिसतो. धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम दिसतो.

अचानक बाळाचा मृत्यू : गर्भधारणेदरम्यान अथवा त्यापूर्वी धूम्रपान करणाऱ्या मातांच्या बाळांना झोपेतच अचानक मृत्यूचा जास्त धोका असतो आणि जर वडीलही धूम्रपान करत असतील तर हा धोका आणखी वाढतो.

स्ट्रोक : धूम्रपानामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद पडतो. परिणामी अर्धांगवायू, बोलण्यात अडचण किंवा मृत्यू होऊ शकतो. स्ट्रोक हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे आणि ज्येष्ठांमध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहेत.

महाधमनीला इजा : महाधमनी ही शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या महाधमनीला इजा होण्याची भीती असते. धमनी त्यामुळे विस्फारते. रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips – मासिक पाळीमध्ये 2 रुपयांचे हे फळ खायलाच हवे, वाचा Health Tips – मासिक पाळीमध्ये 2 रुपयांचे हे फळ खायलाच हवे, वाचा
अलीकडे बहुतांशी महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता यासंदर्भात खूप सारे प्राॅब्लेम्स पाहायला मिळतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या खाण्यावरुनच आपल्या निरोगी आयुष्याची...
भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी, रुग्णवाहिका रस्त्यातच ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; मॅरेथॉनच्या प्रायोजकत्वासाठी अधिकाऱ्यांची धावा ‘धाव’, प्रशासन फक्त ३० लाख देणार
कौटुंबिक वादातून काकीनेच दिली पुतण्याची सुपारी, नऊ दिवसांत पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल
येऊरमधील दोनशे बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा! मुंबई हायकोर्टाचे आदेश; ठाणे पालिकेला तिसऱ्यांदा झापले
खालापूर टोल नाक्यावर बोगस पासची विक्री, सुरक्षारक्षकाचा कारनामा
भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी लाटल्या आदिवासींच्या जमिनी