Skin Care – आता ब्लॅकहेडस् दूर ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर

Skin Care – आता ब्लॅकहेडस् दूर ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर

चेहऱ्याची काळजी घेताना आपल्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे आपल्या चेहऱ्याला कोणती क्रिम सूट होते किंवा नाही होत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ब्लॅकहेड्स आपल्या नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे निर्माण होतात. परंतु योग्य ती काळजी घेतल्यामुळे, ब्लॅकहेडस् कमी होऊ शकतात.

बरेचदा नाक, हनुवटी, कपाळावर आपल्या ब्लॅकहेडस् दिसतात. त्यांना काढणे थोडे कठीण असते. खासकरून धावपळीच्या वेळापत्रकात महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच आपण घरच्या घरी अगदी साधे सोपे उपाय वापरून ब्लॅकहेडस् काढू शकतो.

Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा ग्लो

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. ब्लॅकहेड्समुळे बाहेर जातानाही कसेतरी वाटते. तसेच पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे ब्लॅकहेड्स कसे काढायचे हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल. पण अगदी घरच्या घरी साधे उपया करुनही ब्लॅकहेडस् पासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे नक्कीच हे साधे सोपे उपाय करुन बघा.

ओट्स आणि ग्रीन टी- एक कप ग्रीन टी तयार करा. दरम्यान, ओट्स पावडर बनवण्यासाठी दोन चमचे ओटस् बारीक करा. एका वाडग्यात ओट्स पावडर घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात ग्रीन टी घाला. एक पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या ब्लॅकहेडस् असलेल्या भागावर लावा. एक्सफोलिएट करण्यासाठी हळूवारपणे आपल्या बोटांनी मालिश करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा.

साखर आणि मध- दोन चमचे साखर घालून एक चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर जिथे ब्लॅकहेडस् आहेत तिथे हे मिश्रण लावा. त्यानंतर त्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांसाठी गोलाकार मसाज करा. त्यानंतर 8 ते 10 मिनिटांसाठी त्वचेवर तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा सोपा आणि घरगुती उपाय नक्की करून बघा.

Skin Care – तुमच्या त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य दडलंय या फुलामध्ये, वाचा

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऑपरेशन यशस्वी झाले, पण रुग्णाचा मृत्यू झाला; BRS आमदारांच्या पक्षांतराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत ऑपरेशन यशस्वी झाले, पण रुग्णाचा मृत्यू झाला; BRS आमदारांच्या पक्षांतराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तेलंगणा विधानसभेतील आमदारांच्या पक्षांतर बंदीबाबत परखडपणे भाष्य केले. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 2023 मध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस)...
तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेसह रसातळाला जा! टॅरिफ बॉम्ब फोडल्यानंतर रशिया- हिंदुस्थानबाबत ट्रम्प बरळले
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहितसह 7 जणांची पुराव्यांअभावी सुटका
मला कॉपी करू दे, अन्यथा हातपाय तोडून टाकीन; भाजपच्या माजी खासदाराने मित्राला दिली होती धमकी
DGCAचे धक्कादायक ऑडिट, 8 एअरलाइन्समध्ये आढळल्या 263 त्रुटी
‘लोकसभा मे निपट लिया’ म्हणून राज्यसभेतून पळ काढला, संजय राऊत यांचा मोदी-शहांवर निशाणा
मोदींच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर टॅरिफ लादल्यापासून भाजपची वाचा गेलीय, सरकारने शेपूट घातले – संजय राऊत