लश्कर ए तोएबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही; UNSC अहवालातून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाममध्ये (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. आता या प्रकरणावरील संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध देखरेख पथकाने सांगितले की, द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने पहलगाम हल्ल्याची दोनदा जबाबदारी घेतली होती आणि हल्ल्याच्या ठिकाणाचे फोटो देखील जारी केले होते. या पथकाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या पाठिंब्याशिवाय हा हल्ला होऊ शकलाच नसता.
UNSC मध्ये ISIL, Daesh, Al-Qaeha सारख्या दहशतवादी संघटनांवर देखरेख करणाऱ्या पथकाने 36 वा अहवाल सादर केला. या अहवालात असे म्हटले आहे की, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. अहवालात म्हटले आहे की, त्याच दिवशी टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि हल्ल्याच्या ठिकाणाचा फोटोही प्रसिद्ध केला. दुसऱ्या दिवशी टीआरएफनेही या हल्ल्याची जबाबदारी घेतली. परंतु नंतर 26 एप्रिलला टीआरएफने माघार घेतली. तेव्हापासून टीआरएफने यावर कोणतेही विधान दिलेले नाही आणि इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.
अहवालात म्हटले आहे की, हा हल्ला लष्कराच्या मदतीशिवाय होऊ शकला नसता. लष्कर आणि टीआरएफमध्ये संबंध आहेत. हा हल्ला टीआरएफने केला होता, जो लष्करसोबत जोडला गेलेला आहे. नुकतेच अमेरिकेने टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List