अर्थतज्ञ मेघनाद देसाई यांचे निधन
प्रख्यात अर्थतज्ञ व ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य पद्मविभूषण मेघनाद देसाई यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे ते सदस्य होते. वंशभेदाच्या मुद्दय़ावर त्यांनी काही वर्षांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. ब्रिटन आणि हिंदुस्थानचे संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List