हातखंबा येथे गॅस टँकर पलटी होऊन वायुगळती, मुंबई-गोवा महामार्ग 14 तास ठप्प

हातखंबा येथे गॅस टँकर पलटी होऊन वायुगळती, मुंबई-गोवा महामार्ग 14 तास ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून वायुगळती होऊ लागल्याने महामार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली. प्रशासनाने तातडीच्या हालचाली करत परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

जयगडवरून गोव्याकडे जाणाऱया एलपीजी गॅस टँकरला हातखंबा येथे अपघात झाला. अपघातानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून वायुगळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हातखंबा गावाजवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

अपघातस्थळी गॅस टँकरमधील वायू रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर मागवण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱया टँकरमध्ये भरण्यात आला. त्यानंतर सुरक्षेची खात्री करून दुपारी 2 वा 10 मिनिटांनी महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हलक्या वाहनांना वळके ते बावनदी या पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मुंबई-गोवा महामार्गावरील 14 तास ठप्प असलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;