Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा ग्लो

Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा ग्लो

चेहऱ्यासाठी आपण घरच्या घरी नानाविध उपाय करत असतो. परंतु अनेक उपाय केवळ नावापुरतेच असतात. मग आपण पार्लरचा रस्ता धरतो. परंतु पार्लरमध्ये गेल्यावर खिशालाही भूर्दंड बसतो. अशावेळी हमखास उत्तम उपाय म्हणजे गुलाबजल आणि दही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दही हे असतेच. दही आणि गुलाबजल चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. या फेसपॅकने त्वचेवर ग्लो तर येईलच. शिवाय त्वचेला थंडावाही मिळेल.

Skin Care – बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा

चेहऱ्यावर आपण दही लावण्याचे खूप सारे फायदे आहेत. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिड मुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. मृत त्वचा निघून गेल्यामुळे दह्यामुळे त्वचा चमकदार होते. त्यासोबतच दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी हे त्वचेच्या रक्षणासाठी उत्तम मानले जाते. दह्यामध्ये असलेले कॅल्शियम डार्क सर्कलसाठी अतिशय उपयोगी मानले जाते.

Beauty Tips – सणासमारंभासाठी चेहरा सुंदर दिसावा म्हणून ‘ही’ फळे आहेत अत्यंत उपयोगी, वाचा

 

दह्याचे फेसपॅकमुळे चेहरा नितळ आणि तजेलदार होतो. तसेच स्किनवरील टॅनिंग सुद्धा निघण्यास मदत होते. चेहरा कोरडा पडल्यास दह्याचा फेसपॅक हा कायम एक उत्तम उपाय मानला जातो.

 

असा करा दह्याचा फेसपॅक

दही – 2 टेस्पून
बेसन- 2 टीस्पून
गुलाबजल – 1 टीस्पून
कृती- एका वाडग्यात दही, गुलाबजल आणि बेसन हे तीन घटक एकत्र करून पेस्ट बनवा.
आता ते चेहऱ्यावर लावा आणि किमान 30 मिनिटे राहू द्या.
काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा.

दह्याच्या या फेसपॅकमुळे काही वेळातच चेहरा तजेलदार दिसेल. तसेच दह्यामुळे त्वचेलाही चांगलाच थंडावा मिळतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी