मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी पलटी; सातजण जखमी
माणगावपासून 15 किमी अंतरावर असणाऱ्या मौजे रातवड गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात झाला. या अपघातात बस पलटी होऊन सातजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
श्रीवर्धन ते भिवंडी एसटी बस माणगावहून मुंबईकडे जात असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मौजे रातवड गावच्या हद्दीत चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गाच्या खाली जाऊन शेतात पलटी झाली. बसमध्ये एकूण 24 प्रवासी प्रवास करीत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List