नागपूर फाइल्स – बारमध्ये ‘सरकारी कारभार’ करणारा अधिकारी निलंबित
देवाभाऊंच्या नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणारे गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी सोनटक्के यांना निलंबित केल्याची माहिती दिली. त्यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने आज काढला.
नागपुरातील कीर्ती बारमध्ये टेबलवर महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेल्या फाईल ठेवून एक अधिकारी दारू ढोसत होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारने तातडीने दिले. व्हिडीओची चौकशी केल्यानंतर तो अधिकारी चामोर्शी येथे उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असलेले देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या निलंबनाच्या आदेशाचे शासनाचे पत्र गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
सखोल चौकशी करा – विजय वडेट्टीवार
देवानंद सोनटक्के यांच्यावर आता सरकारने कारवाई केली आहे. याचा सीसीटीव्ही समोर आले म्हणून कारवाई झाली पण अशा कितीतरी घटना घडत असतील. एका अधिकाऱयाची सरकारी फाईली कार्यालयाबाहेर घेऊन जाण्याची हिंमत झाली कशी? आणि सह्या का केल्या? नेमक्या कोणत्या फाईलींवर सह्या केल्या याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List