अगदी खरंय…. महाराष्ट्राला वाघाचंच काळीज…12 वर्षांत वाघांची संख्या 257 टक्क्यांनी वाढली!

अगदी खरंय…. महाराष्ट्राला वाघाचंच काळीज…12 वर्षांत वाघांची संख्या 257 टक्क्यांनी वाढली!

>> अभय मिरजकर 

महाराष्ट्राने व्याघ्र प्रकल्प उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्यामुळे राज्यात वाघांची संख्या 257 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या राज्यात 446 वाघ आहेत. यामुळे देशात व्याघ्र संवर्धन मोहिमेत महाराष्ट्राने भरीव योगदान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजे-महाराजांनंतरच्या काळात इंग्रज आले आणि शिकारींचे प्रमाण वाढले. त्यामुळे देशातील वाघ लुप्त होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. याचदरम्यान 1973 मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यावेळी देशात 1800 वाघांची संख्या नोंदली गेली. नंतर वाघांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने देशात व्याघ्र प्रकल्प सुरू केले. सध्या देशातील 53 व्याघ्र प्रकल्पांपैकी 6 व्याघ्र प्रकल्प एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. त्यात पेंच, बोर, सह्याद्री, ताडोबा अंधारी, नवेगाव नागझिरा, मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. देशात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.

पाच वर्षांत 667 वाघांचा मृत्यू

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने तयार केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत तब्बल 667 वाघांचा मृत्यू झाला. यात 341 म्हणजेच 51 टक्के वाघांचा व्याघ्र प्रकल्पाबाहेर मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यंदा महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाबाहेर 20 हून अधिक वाघांचा मृत्यू झाला, तर 13 वाघांचा मध्य प्रदेशात, 8 वाघांचा केरळमध्ये आणि सात वाघांचा कर्नाटकात मृत्यू झाला. दरम्यान, 2012 आणि 2024 दरम्यान 1 हजार 519 वाघांचा मृत्यू झाला, तर 634 म्हणजेच 42 टक्के वाघांचा व्याघ्र प्रकल्पाबाहेर मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील सद्यस्थिती

व्याघ्र प्रकल्प        वाघांची संख्या

ताडोबा-अंधारी           97

पेंच                          73

मेळघाट                    32

सह्याद्री                     17

नवेगाव-नागझिरा        17

बोर                          8

संपूर्ण जगातील वाघांची संख्या विचारात घेता तब्बल 75 टक्के वाघ हिंदुस्थानात आहेत. 2022 च्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या 3682 एवढी आहे. 2018 मध्ये ही संख्या 2996 एवढी नोंद झाली होती.

महाराष्ट्रात 2006 मध्ये 103 वाघांची नोंद झाली होती. ती संख्या 2010 मध्ये 168 आणि 2014 मध्ये 190 वर पोहोचली. पुढे 2018 मध्ये 312 वाघांची नोंद करण्यात आली, तर 2022 मध्ये 444 वाघांची नोंद झाली. मागील 12 वर्षांत एकटय़ा महाराष्ट्रात वाघांची संख्या तब्बल 257 टक्क्यांनी वाढल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी