काय आहे 6-6-6 फिटनेस रूल, वेट लॉससाठी हा किती आहे हेल्पफुल?
वाढते वजन ही अनेक लोकांची समस्या बनली आहे. अशात लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे फिटनेस ट्रेंड फॉलो करीत असतात. रोज कोणता ना कोणता तरी नवा ट्रेंड येत असतो. कोणी इंटरमिटेंट फास्टींग बाबत बोलतो तर कोणी 12-3-30 वर्कआऊटच्या गोष्टी करत असतो. आता यातच एक नवा 6-6-6 फिटनेस रूल आला आहे. त्याने वेट लॉस आणि फिट बॉडी मिळण्यासाठी लोक त्यास वेगाने फॉलो करीत आहेत.
याचे नाव भलेही थोडे अजब वाटो, परंतू हा रुल फिटनेसला स्ट्रक्चर देणे आणि मोटीव्हेशन कायम ठेवण्यात मदतगार मानला जात आहे. सोशल मीडिया फिटनेस इंफ्लुएन्सर्सपासून जिम ट्रेनर्सपर्यंत या नियमाला आपलेसे करण्याचा सल्ला देत आहेत. परंतू अखेर हा 6-6-6 रूल काय असतो आणि खरेच यामुळे वेट लॉसला मदत मिळते का ? चला तर जाणूया विस्ताराने…
काय आहे 6-6-6 फिटनेस रूल?
या नियमाबाबत बोलताना 6-6-6 रूलमध्ये तीन वेगवेगळे 6 सामील असतात. उदाहरणार्थ या आठवड्यातील 6 दिवस वर्कआऊट करणे, 6 मिनटांसाठी रोड मेडिटेशन करणे आणि आठवड्यामध्ये 6 मैलापर्यंत वॉक वा रनिंग करणे. या प्रोसेसला 6-6-6 रूल म्हटले जाते. चला तर विस्ताराने पाहूयात..
आठवड्यात 6 दिवस वर्कआऊट करणे याचा अर्थ दर आठवड्यात तुम्हाला किमान 6 दिवस कोणत्या ना कोणत्या फिजिकल एक्टिव्हीटीत भाग घ्यावा लागेल. मग ते जिम ट्रेनिंग असो, योगा, कार्डीओ वा घरातच बॉडी वेट एक्सरसाईज करणे. या रुलमध्ये एक दिवसाचा रेस्ट ठेवला आहे, म्हणजे बॉडीला रिकव्हरीचा वेळ मिळावा.
6 मिनटांपर्यंत रोज मेडिटेशन वा माईंडफूलनेस प्रॅक्टीस – या फिटनेस ट्रेंडचा दुसरा नियम आहे 6 मिनिटं मेडिटेशन वा माईंडफुलनेस प्रॅक्टीस करणे. यासाठी तुम्हाला दिवसातून कोणत्याही वेळेत 6 मिनिटं मेडिटेशन करु शकता. किंवा माईंडफूल ब्रिदींग करु शकता. याने स्ट्रेस कमी होतो आणि एकाग्रता वाढते. ज्यामुळे फिटनेस गोल्स मिळवणे सोपे होते.
आठवड्यातून 6 मैल वॉक वा रनिंग करणे – या ट्रेंडचा तिसरा नियम आहे 6 मैल वॉक वा रनिंग करणे. अर्थात हे तुम्हाला आठवड्यात करायचे आहे रोज नाही. आठवडाभरात एकूण 6 मैल वॉक वा रनिंग करण्याने मेटाबॉलिझ्म बूस्ट होतो आणि एक्स्ट्रा कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.
वेट लॉससाठी किची फायदेशीर आहे हा रूल?
या नियमाचा हेतू फिजिकल, मेंटल आणि कार्डिओ हेल्थ तिघांचे बॅलन्स करणे हा आहे. याच्या फायद्याचा विचार केला असता यामुळे तुमची लाईफस्टाईलमध्ये सातत्य बनते. उदाहरणार्थ आठवड्यातून 6 दिवस वर्कआऊट करण्याच्या सवयीने तुमची लाईफस्टाईलमध्ये फिजिकट एक्टीव्हीटी एक रुटीन बनून जाते. तसेच रनिंग आणि वॉकींगमुळे कॅलरी बर्न करण्यातही मदत मिळते. त्यामुळे हृदयाचे आरोग्न सुरळीत रहाते. तसेच मेडिटेशन केल्याने मेंटल स्ट्रेस दूर होतो आणि तुम्ही फ्रेश फिल करता. या रुलचा इमानदारीने पालन केले तर रिझल्ट मिळू शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List