BDD chawl redevelopment – 556 लाभार्थ्यांना आठवडाभरात घराचा ताबा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

BDD chawl redevelopment – 556 लाभार्थ्यांना आठवडाभरात घराचा ताबा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वरळी बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान मोठ्या घराचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील डी आणि ई या दोन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. त्यामुळे फेज 1 अंतर्गत तयार झालेल्या 556 लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळावा आणि आठडाभरात चावी वितरण आयोजित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), नेते, युवासेनाप्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

‘माझ्या मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1 अंतर्गत 556 घरे पूर्णतः तयार झालेली आहेत. ही घरे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी सज्ज असून, लाभार्थ्यांना मनःपूर्वक वाटते की लवकरात लवकर चाव्यांचे वितरण झाले पाहिजे, जेणेकरून ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील. हे लाभार्थी अजून किती दिवस भाड्याच्या घरात किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणार? या प्रकल्पांतर्गत नवीन घरे वितरित झाल्यानंतर ट्रान्झिट कॅम्प रिकामे होतील. त्यामुळे पुढील लाभार्थ्यांना तेथे स्थलांतर करता येईल आणि त्यामुळे संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास चालना मिळेल. त्यामुळे येत्या आठवड्यात फेज 1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा’, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील एकूण 8 विंगपैकी डी आणि ई या दोन इमारतींना ओसी मिळाली आहे.

शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश

  • शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता.
  • डिसेंबरपर्यंत वरळी बीडीडी चाळीतील 1690, नायगाव बीडीडी चाळीतील 1400 आणि ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 342 रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी