Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट

Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट

चिपळूण शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुलफीकार मुल्ला (वय 22) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असून त्यांचे कुटुंब एकता अपार्टमेंटमध्ये राहते. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबीय काळजीत होते. हराच वेळ वाट बघितल्यानंतर त्यांनी शेवटी दरवाजा तोडला. त्यावेळी ओवेसने लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी तात्काळ घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आत्महत्या असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. त्याने नेमके कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत. ओवेसच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;