वयाच्या 67 व्या वर्षी आजही ‘या’ अॅक्शन हिरोच्या दारात निर्मात्यांची रांग
सनी देओल म्हटल्यावर धर्मेंद्रचा मुलगा अशी ओळख नजरेसमोर येते. अभिनेता म्हणून सनीने त्याची कारकिर्द अगदी चांगलीच गाजवली होती. सनीचा बेताब हा सिनेमा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. परंतु सनी केवळ प्रेमपट करुन गप्प बसला नाही. तर सनीने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये बॉर्डरसारखा सिनेमाही केला आहे. सनीचे वय हे 67 असले तरी, आजही त्याच्याकडे वैविध्यपूर्ण चित्रपटांची रांग लागलेली आहे.
सनी देओलने त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत एनर्जी उत्तम राखली आहे. त्याच्या उत्तम अभिनयामुळे आजही त्यांच्या चित्रपटांना तितकीच पसंती आहे. त्यामुळे सध्या वयाच्या 67 वन्या वर्षीही त्याच्याकडे सिनेमांची कमी नाहीए.
गदर- 2 सारख्या बहुचर्चित चित्रपटांनतर आता लवकरच एका मोठ्या बजेटच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वयाच्या 67 वर्षी सेम एनर्जी घेऊन सुपरहिट सिनेमे करणारे सनी देओल पहिल्यांदाच एक्सेल एंटरटेनमेंटसोबत एक बिग बजेट सिनेमा करणार आहेत. या चित्रपटात सनी देओल सोबत फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे देखील असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी करणार असून, अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे चाहते या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत.
गदर 2’ आणि ‘जाट’ या सलग दोन यशस्वी चित्रपटांनंतर सनी देओल अॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी सज्ज झालाय. 2025 मध्ये सनी देओल ‘बॉर्डर 2’, ‘लाहौर 1947’ आणि ‘रामायण: पार्ट वन’ यांसारख्या आगामी चित्रपटांध्ये झळकणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List