‘प्रलय’ची यशस्वी चाचणी! सीमारेषेची सुरक्षा कडक होणार
हिंदुस्थानने आपल्या स्वदेशी शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल ‘प्रलय’ची लागोपाठ दोनदा यशस्वी चाचणी केली. पहिली चाचणी 28 जुलै आणि दुसरी चाचणी 29 जुलैला पार पडली. या चाचण्या डीआरडीओकडून ओडिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम द्वीपवरून करण्यात आल्या. खास युद्धात वापर करण्यासाठी ही शॉर्ट बॅलेस्टिक मिसाईल बनवण्यात आली आहे. हिंदुस्थानी लष्कर आणि वायुदलाची गरज पाहून याला तयार करण्यात आले आहे.
या मिसाईलची खास वैशिष्ट्ये
- ‘प्रलय’ची स्ट्राईक रेंज 150 ते 500 किमीपर्यंत आहे. हे टॅक्टिकल आणि स्ट्रटेजिक जागी लक्ष्य करते.
- ही मिसाईल 350 ते 700 किलोपर्यंत पारंपरिक वॉरहेड घेऊन जाऊ शकते. कमांड सेंटर, लॉजिस्टिक हब आणि एअरबेससारखे महत्त्वपूर्ण लक्ष्यावर थेट हल्ला करता येतो.
- याला हाय मोबिलिटी व्हीकलवर ट्विन लाँचरसोबत लावण्यात आले आहे. यामुळे संवेदनशील सीमेवर तैनात केले जाऊ शकते.
- या मिसाईलला हिंदुस्थानच्या सीमेवर लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल आणि लाइन ऑफ कंट्रोल वर तैनात केले जाईल.
- या मिसाईलने 10 मिनिटापेक्षाही कमी वेळात लाँच केले जाऊ शकते. युद्धात शत्रूंचे ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
कधी झाली चाचणी
पहिली चाचणी ही 28 जुलैला डॉ. एपीजे अब्दुल कलाम द्वीपवरून सकाळी 9.35 वाजता झाली. मिसाईलने आपले लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले. दुसरी चाचणी 29 जुलैला डॉ. एपीजे अब्दुल कलाम द्वीपवरून करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List