गडकरींचा देशात दबदबा! दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते सी. डी. देशमुख पुरस्काराने गौरव
स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, काकासाहेब गाडगीळ, रघुनाथराव खाडिलकर यांच्यासारख्या नेत्यांनी दिल्लीत आपला ठसा उमटवला. नितीन गडकरींनी काम केले नाही असे सांगणारा एकही खासदार देशात आढळून येणार नाही, अशी गडकरींची स्वीकारार्हता आहे, दिल्लीत आणि देशात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे नितीन गडकरी हे आजच्या पिढीचे प्रभावी नेते आहेत, असे प्रशंसोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काढले.
सरहद संस्थेतर्फे दिला जाणारा दुसरा सी. डी. देशमुख पुरस्कार आज पवार यांच्या हस्ते गडकरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते आजच्या पिढीपर्यंत दिल्लीत ठसा उमटवलेल्या नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला सरहदचे संजय नहार, पत्रकार राजीव खांडेकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे उपस्थित होते. ‘मुद्रा’ या पुस्तकाचे प्रकाशनही या समारंभात करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List