ठाण्यात तीन कोटींचे एमडी जप्त; झोमॅटो बॉयची ड्रग्ज ‘डिलिव्हरी’, गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

ठाण्यात तीन कोटींचे एमडी जप्त; झोमॅटो बॉयची ड्रग्ज ‘डिलिव्हरी’, गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

स्वीगी, झोमॅटोवरून एका क्लिकवर गरमागरम खाद्यपदार्थांची ऑर्डर घरी पोहोचवली जाते. मात्र ठाण्यात चक्क एक झोमॅटो बॉय ड्रग्जची डिलिव्हरी करत असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत माहिती मिळताच त्याची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शिळफाट्यावर सापळा रचून पार्सल बॅगमध्ये ड्रग्जची हेराफेरी करणाऱ्या इरफान शेखच्या (36) मुसक्या आवळल्या आहेत. पथकाने त्याच्याकडून तब्बल तीन कोटींचे एमडी जप्त केले आहे. इरफान नेमक्या कोणत्या ग्राहकांना घरपोच हे ड्रग्ज पोहोचवत होता याची चौकशी पोलीस करत आहेत.

ठाणे शहरात एमडी तस्करीमध्ये वाढ झाली असून या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांकडून धाडसत्र सुरूच आहे. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांकडून नवनवीन फंडे अजमावले जात आहेत.

ठाणे पोलिसांनी अशाच एका एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना एक डिलिव्हरी बॉय एमडीची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिळफाट्याकडून दिवे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. दरम्यान पोलिसांना पनवेलच्या उलवे येथून आलेल्या झोमॅटो बॉयला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पार्सलच्या बॅगमध्ये तब्बल तीन कोटी चार लाख 71 हजार 700 रुपयांचे एक किलो 522 ग्रॅम एमडी मिळाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करत त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणला, त्याने याआधी किती जणांना एमडीची विक्री केली आहे, एमडीचे सेवन करणारे त्याचे ग्राहक कोण आहेत, याचा शोध सुरू केला आहे. तसेच हे आंतरराष्ट्रीय रॅ केट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

खारेगाव टोलनाक्यावर सापळा

एमडीची वाहतूक करणाऱ्या तस्कराच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाला यश आले आहे. शाहरुख मेवासी उर्फ रिझवान (28) असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 92 लाख 68 हजारांचा एमडी जप्त केला आहे. भिवंडी येथून मुंब्याकडे एमडीची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत खारेगाव येथील बंद टोलनाक्यावरून त्याला रंगेहाथ अटक केली. रिझवान हा मूळचा मध्य प्रदेशातील असल्याने त्याने हे एमडी तेथून आणले आहे का, तो हे एमडी कोणाला देण्यासाठी आला होता याचा तपास पोलीस करत आहेत. या दोन्ही कारवायांमुळे एमडीचा गोरखधंदा चालवणाऱ्या तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी