पंतप्रधानांनी थेट ट्रम्प यांचे नाव घेतले तर ते सत्य उघड करतील; राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर निशाणा
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टपणे सांगू शकले नाहीत की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा खोटा आहे. याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे नाव घेऊ शकत नाहीत कारण त्यांना भीती आहे की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संपूर्ण सत्य उघड करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीवर सतत हल्ला चढवत आहेत.
लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना असा दावा केला की, मध्यस्थीबाबतच्या ट्रम्प यांच्या दाव्याबाबतीत पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांचे नाव घेतले नाही कारण त्यांना माहित आहे की जर त्यांनी असे केले तर ट्रम्प संपूर्ण सत्य उघड करतील. काय घडले आहे हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प खोटे बोलत आहेत असे म्हटले नाही. काय घडले आहे हे सर्वांना माहिती आहे. ते बोलूही शकत नाहीत, तर हे वास्तव आहे. जर पंतप्रधान बोलले तर ट्रम्प उघडपणे बोलतील आणि संपूर्ण सत्य सांगतील. म्हणूनच मोदी यांनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
प्रधानमंत्री ने ट्रंप का नाम नहीं लिया। ये सबको मालूम है क्या हुआ है और प्रधानमंत्री बोल नहीं पा रहे हैं।
अगर PM ने बोल दिया, तो ट्रंप खुलकर बोलेंगे और पूरी सच्चाई रख देंगे, इसलिए प्रधानमंत्री बोल नहीं पा रहे हैं।
ट्रंप बार-बार एक ही बात को इसलिए दोहरा रहे हैं, क्योंकि वो… pic.twitter.com/qswPufD5Sl
— Congress (@INCIndia) July 30, 2025
अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबद्दल राहुल गांधी म्हणाले की, सध्या ट्रम्प यांना आमच्यासोबत व्यापार करार करायचा आहे. त्यामुळे ट्रम्प मोदी यांच्यावर दबाव येण्यासाठी सातत्याने युद्धबंदीचा उल्लेख करत आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला दिसेल की कोणत्या प्रकारचा व्यापार करार केला जातो. ट्रम्प पुन्हा पुन्हा सातत्याने युद्धबंदीचे श्रेय घेत आहेत आणि तेच तेच पुन्हा सांगत आहेत कारण त्यांना व्यापार करारावर नरेंद्र मोदींवर दबाव आणायचा आहे. तुम्हाला दिसेल की कोणत्या प्रकारचा व्यापार करार होतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी व्यापार कराराबाबतही मत व्यक्त केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List