बाबा वेंगाची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत! जपानमध्ये त्सुनामीचे वर्तवले होते भाकीत
सध्या जगभरात बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची चर्चा होत आहे. बाबा वेंगा यांनी 2025 बाबात केलेली भाकीते धडकी भरवणारी आहेत. 2025 हे जगाच्या अंताची सुरुवात असेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. तसेच 2025 मध्ये जुलै महिन्यात जपानमध्ये मोठी त्सुनामी येईल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले होते. तसेच या वर्षात जगभरात मोठ्या युद्धांचीही त्यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे. तसेच जपानमधील त्सुनामीचे भाकीतही खरे ठरल्याने त्यांच्या भविष्यवाणीची चर्चा होत आहे.
जपानमध्ये त्सुनामीची आधीच भविष्यवाणी करण्यात आली होती. बाबा वेंगा यांच्याप्रमाणेच जपानचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता रियो तात्सुकी यांनी या वर्षी जुलैमध्ये जपानमध्ये त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांनी त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यास सुरुवात केली होती. त्सुनामीच्या भयानक लाटांमुळे जपानमध्ये भीतीचे वातावरण आहे. जपानव्यतिरिक्त, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि हवाईमध्येही त्सुनामीने कहर केला आहे. रशियाला 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरा दिल्यानंतर जपानमध्येही त्सुनामीच्या लाटा उसळत आहेत.
‘बाबा वांगा’ म्हणून ओळखले जाणारे जपानचे मंगा कलाकार रिओ तात्सुकीने 5 जुलै रोजी किंवा त्याच्या आसपास जपानमध्ये मोठ्या त्सुनामीचा इशारा दिला होता. ते अनेक आपत्ती आणि जागतिक घटनांच्या अचूक भाकितांसाठी ओळखले जातात. बाबा वांगाप्रमाणेच जपानच्या रियो तात्सुकीनेही पूर्वी जपानमधील आपत्तींबद्दल अचूक भाकित केले आहे. तात्सुकीने या कॉमिक्सद्वारे भाकित केले आहे. 1999 मध्ये त्यांची एक ग्राफिक कादंबरी आली, ज्याचे नाव ‘द फ्युचर आय सॉ’ होते. यामध्ये त्यांनी 2011 मध्ये जपानमध्ये मोठ्या आपत्तीचे संकेत दिले होते. ही भाकित अगदी अचूक होती. 2011 मध्ये एक भयानक त्सुनामी आली आणि या दरम्यान फुकुशिमा अणुभट्टीचे नुकसान झाले. या आपत्तीत 18 हजार लोकांचा मृत्यू झाला.
2021 मध्ये तात्सुकीच्या ‘द फ्युचर आय सॉ’ ची नवीन आवृत्ती आली. यामध्ये त्यांनी जुलै 2025 मध्ये जपानमध्ये पुन्हा त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली. या भाकितामुळे लोकांनी यावर्षी जपानमधील सुट्ट्या रद्द करण्यास सुरुवात केली. आता 30 जुलै रोजी जपानमध्ये 16 ठिकाणी त्सुनामी लाटा उसळत आहेत. सर्वत्र आपत्कालीन सायरन वाजत आहेत आणि पुन्हा एकदा ही भाकिते आणि बाबा वेंगा चर्चेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List