Russia Earthquake – 8.8 तीव्रतेच्या भूकंपानं पृथ्वी हादरली; रशिया-जपानमध्ये त्सुनामीच्या प्रलयकारी लाटा धडकल्या
रशियाच्या कामचटका बेटांजवळ 8.8 तीव्रतेचा प्रलयकारी भूकंप झाला आहे. पॅसिपिक समुद्रामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदु आहे. भूकंपानंतर अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रशिया आणि जपानच्या किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या प्रचंड लाटांचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.
An earthquake of magnitude 8.8 hit Petropavlovsk-Kamchatsky, Russia, on 29th July 23:24 pm UTC (4.54 am IST, July 30): US Geological Survey pic.twitter.com/1qRbhaBbfi
— ANI (@ANI) July 30, 2025
हिंदुस्थानी वेळेनुसार बुधवारी पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी कामचटका बेटांजवळ शक्तीशाली भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली असून भूकंपानंतर जपान, रशिया आणि अमेरिकेतील किनारी राज्यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा पोहोचल्याचे असून भूकंपामुळे रशियाच्या सुदूर पूर्वेकडील किनारी भागात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
FIRST pic of a kindergarten in Russia after walls COLLAPSED from earthquake
There were no children inside, everyone was able to evacuate in time https://t.co/mEmIhVlr3c pic.twitter.com/SS7XRq1lFM
— RT (@RT_com) July 30, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List